युवकांसाठी सुवर्ण संधी : अधिवेशनामध्ये काम करण्याची इच्छा असल्यास यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिपमध्ये सहभागी व्हा : आ. सतेज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर – महाराष्ट्राच्या आगामी पावसाळी अधिवेशनात काम करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी एक सुवर्णसंधी असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्टवरून दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आ. सतेज पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्याच्या येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी तुम्हाला काम करायची इच्छा आहे का? जर तुम्हाला राज्याच्या प्रश्नांची माहिती असेल आणि ते प्रश्न विधान भवनात विचारले जावेत असे वाटत असेल तर तुमच्यासाठी यशवंतराव चव्हाण रिसर्च फेलोशिप एक संधी आहे. अधिक माहितीसाठी, QR कोड स्कॅन करा आणि Hi असा मेसेज पाठवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.