प्रवासी महिलेचे दागिने चोरट्यांनी लांबवले...चोरट्यांना अटक
इचलकरंजी - शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात भेंडवडे गावी जाण्यासाठी अंकिता चौगुले या आल्या होत्या. त्यावेळी त्या एस टी मध्ये चढत असताना रोकड आणि चांदीची जोडवी असलेली त्यांची बॅग चोरट्यांनी लांबविली. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गिता लोंढे, शरिफा मानकर, सारीका लोंढे आणि ममता लोंढे या संशयित महिला चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याकडुन चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.