देशाच्या राजधानीत अग्नितांडव ; 21 जणांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली – दिल्ली येथील पंचतारांकीत हॉटेलला अचानक आग लागली आहे. या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आग लागलेल्या इमारतीमधून 37 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची आर्थिक मदत आणि जखमींना 50 हजार रुपये पंतप्रधान निधीतून देण्यात येतील, असे जाहीर केले आहे.