तारदाळात मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला चोपले...

<p>तारदाळात मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला चोपले...</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील तारदाळमध्ये अक्षय पाटील या युवकाने एका मुलीची छेड काढण्याच्या प्रयत्न केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी अक्षयला चांगला चोप दिला. शहापूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून अक्षयची जमावाच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी त्याची वैदयकीय तपासणी करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई शहापूर पोलिस करत आहेत.