चंद्रे येथील दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार...
कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील ६२ वर्षीय कृष्णात पाटील हे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. पाटील यांच्या अपघाती निधनामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.