भोंदू बाबासमोर नतमस्तक झाल्याचा आरोप; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अंजली दमानिया यांची जोरदार टीका

<p>भोंदू बाबासमोर नतमस्तक झाल्याचा आरोप; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अंजली दमानिया यांची जोरदार टीका</p>

पुणे : भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि या यांनी सोशल मीडियावर कथित भोंदू बाबा अशोक खरात यांना नतमस्तक होतानाचा एक फोटो शेअर केलाय. फोटो खाली एक पोस्ट करत चंद्रकांत पाटील आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. दमानिया यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे कथित भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पुढे वाकलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोवरून त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या विचारसरणीवर आणि परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आपल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी म्हटले आहे, “हे आपले मंत्री चंद्रकांत पाटील. भाजपचे वरिष्ठ नेते… साहेब अशोक खरात यांच्या पुढे वाकत आहेत. निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं. जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवच देश वाचवो.”

या पोस्टमुळे सोशल मीडियावर भाजपवर टीकेची लाट उसळली असून, अनेकांनी अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. पुरोगामी विचारांचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते अशा व्यक्तींसमोर नतमस्तक होत असल्याने विरोधकांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.