मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी वाढ...मोदी सरकारचा मोठा निर्णय 

ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण 

<p>मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी वाढ...मोदी सरकारचा मोठा निर्णय </p>

नवी दिल्ली – मोदी सरकारने सोने आणि चांदीच्या एकूण आयात शुल्काबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

 केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क 6 वरून वाढवून 15 टक्के केले आहे. यामध्ये 10 टक्के मूलभूत सीमा शुल्क आणि 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर यांचा समावेश आहे. या सरकारच्या निर्णयामुळे कल्याण ज्वेलर्स आणि टायटन सारख्या ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

यामुळे  मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या जुलै 2026 च्या फ्युचर्समध्ये प्रति किलो 16,743 रुपयांची वाढ होऊन ती 2,95,805 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या जून 2026 च्या फ्युचर्समध्ये प्रति 10 ग्रॅम 9,206 रुपयांची (6 टक्के) वाढ होऊन किंमत 1,62,648 रुपये झाली आहे.