लोकप्रतिनिधींनी अनावश्यक दौरे, ताफ्यावरील खर्चात कपात करावी : अखिल भारतीय हिंदू महासभेची मागणी
कोल्हापूर - आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी करू नका, परदेश दौरे टाळा, इंधन बचत करा, वर्क फॉर्म करा असं आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज हिंदू महासभेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. सरकारने जनतेला आवाहन करण्यापेक्षा लोकप्रतिनिधींचे अनावश्यक दौरे, ताफ्यावर होणाऱ्या खर्चात कपात करावी, इलेक्ट्रिक वाहनं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरास लोकप्रतिनिधींनी प्राधान्य द्यावे, शासनाने काटकसर आणि ऊर्जा बचत आचारसंहिता लागू करावी, आदि मागण्या महासभेच्या शिष्टमंडळाने गुरव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याप्रसंगी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर, अभिषेक पाटील, शीलाताई माने, विकास जाधव, सुनील सावंत, अजय सोनवणे, प्रशांत पाटील, डॉ. अश्विनी माळकर, बबन खोपकर आदी उपस्थित होते.