आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीगला आजपासून सुरूवात...

<p>आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीगला आजपासून सुरूवात...</p>

कोल्हापूर – शहरातील चित्रपट व्यवसायातील निर्माते, तंत्रज्ञ, कामगार, कलाकार यांच्या पुढाकारातून आम्ही चित्रकर्मी क्रिकेट लीग २०२६ पर्व ४ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री सुरेखा कुडची आणि उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करून करण्यात आले आहे.

यावेळी अभिनेत्री कुडची आणि उपमहापौर जरग यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कळंबा येथील कॅसल स्पोर्टस टर्फ मैदानात ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. यावेळी रमेश चावरे, सर्वेश जाधव, अमर मठपती, निर्मिती व्यवस्थापक, निर्माते सुनील चौगले, आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे, दिग्दर्शक संदीप पाटील यांच्यासह खेळाडू, तसेच कामगार, कलाकार, संघ प्रमुख उपस्थित होते.