करवीर तहसीदारांच्या आश्वासनानंतर राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळ कृती समितीचे आंदोलन मागे...

<p>करवीर तहसीदारांच्या आश्वासनानंतर राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळ कृती समितीचे आंदोलन मागे...</p>

कोल्हापूर - जिल्ह्यातील गाव नकाशा आणि सर्व्हे नकाशावर स्पष्ट नोंद असलेल्या शासकीय रस्ते आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून ते तात्काळ खुले करावेत, अतिक्रमण करणाऱ्यांचे फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक करून त्यांचे शासकीय लाभ बंद करावेत, आदि मागण्या महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळ, कोल्हापूर जिल्हा कृती समितीकडून केल्या जात होत्या. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने समितीने ६ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान, करवीर तहसीलदार स्वप्नील पवार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सोमवारी हे उपोषण मागे घेतल्याचे कृष्णात पाटील यांनी सांगितले.

या आंदोलनात कृष्णात जाधव, बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णात पाटील, मारुती खाडे हे सहभागी झाले होते.