देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य निर्माण करणं, हे सरकारचं...: खा. शरद पवार 

<p>देशातील जनतेमध्ये विश्वास, स्थैर्य निर्माण करणं, हे सरकारचं...: खा. शरद पवार </p>

मुंबई – दोन दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावर ट्वीट करून खा. शरद पवार यांनी, देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे म्हटले आहे. 


खा. शरद पवार यांनी म्हटले आहे कि, मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.