पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद...
राज्यात अंमलबजावणी सुरु
मुंबई – पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद देत राज्यात अंमलबजावणी सुरु केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरी शिवाय राज्यातील मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले कि, एखाद्यावेळी तातडीने कुठे जायचं असेल तर मी विमान वापरतो. माझ्या वर्षभरात चार-पाच वेळा तातडीचे काम असते तेव्हाच विमानाने जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप व्यस्त असतात, म्हणून ते विमान वापरतात, तसेच माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईन असतात. मी जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांना बोलवत नाही. मी ऑनलाईन बैठका घेऊन तोडगा काढतो, असे ते म्हणाले आहेत.