'नीट' परीक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय...विद्यार्थांचा संताप 

<p>'नीट' परीक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय...विद्यार्थांचा संताप </p>

नवी दिल्ली – 'नीट' परीक्षेच्या पेपर फुटीमुळे ३ मे २०२६ रोजी झालेली 'नीट' परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थांना पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे राष्ट्रीय चाचणी संस्थेने म्हटले आहे. या चाललेल्या खेळखंडोबामुळे विद्यार्थांमधून संताप व्यक्त होत आहे. हे पेपर फुटीचे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले आहे.


केंद्र सरकारने पेपर फुटीच्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून यातील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासादरम्यान 'एनटीए' सीबीआयला सर्व प्रकारचे सहकार्य, आवश्यक कागदपत्रे आणि रेकॉर्ड उपलब्ध करून देणार आहे. या चौकशीतून पेपरफुटीचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचले आहेत, हे समोर येणार आहे. परीक्षा रद्द केल्याने देशभरातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.