दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २०२५ चे ग्रंथ पुरस्कार जाहीर

<p>दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २०२५ चे ग्रंथ पुरस्कार जाहीर</p>

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे २०२५ सालातील ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, विविध साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती दमसाचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त साहित्यकृती व लेखकांची नावे पुढीलप्रमाणे :

१. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरी) विभागून – धरणीमाय : शशिकांत चौधरी आणि भिंगुळवाणे दिवस : रमेश साळुंखे

२. शंकर खंडू पाटील पुरस्कार (स्त्रीप्रधान कथासंग्रह) – सर्वेपि सुखिन सन्तु : निलांबरी कुलकर्णी

३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कादंबरी) – दाही दिशा : रवींद्र ठाकूर

४. कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार (संकीर्ण) – महामुद्रा : धनंजय बिजले

५. शैला सायनाकर पुरस्कार (कवितासंग्रह) – माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ : चंद्रकांत बाबर

६. चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – घुंगुरमाळा : महानंदा मोहिते

७. बालवाङ्मय पुरस्कार – श्री संवाद : श्रीयांश हराडे

याशिवाय विशेष पुरस्कारांसाठीही विविध साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये थिजलेल्या माणुसकीचा गहिवर : सोनिया पाटील, कर्तृत्वाचा एक शोध : रवींद्र बेडकीहाळ, गुलामी जिणं : रमेश जावीर, जगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज : मधुकर जाधव, चलबट : अर्जुन व्हटकर, राजधुरंदर ताराराणी : राजेंद्र घाडगे, अर्थतरंग : संजय ठिगळे, कोलाहालची क्षणचित्रे : लवकुमार मुळे, फक्कड : सचिन अवघडे, घनघोर काळीजभर : रवी बावडेकर, तू ही गोष्ट सांगायला नको होती : सुनील साळुंके, वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन : सिद्धार्थ कांबळे, मी चंदन व्हाया बघतो : सुधाकर इनामदार, स्त्री क्षेत्र ऋतुक्षेत्र अम्बुबीजानाम् : दिपाली घाडगे, अंतरंग शब्दाचे : संजय वारके, निळी सावळी नव्हाळी : स्वाती पाटील, सायतारे : प्रकाश कुलकर्णी, काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा : सुरज चौगुले तसेच महात्मा बसवेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांचे सामाजिक चिंतन : चारुदत्त कासार या साहित्यकृतींचा समावेश आहे.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२५ च्या ग्रंथ पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून भीमराव धुळूबुळू, प्रा. दि. बा. पाटील, गौरी भोगले आणि पाटलोबा पाटील यांनी काम पाहिले.