रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णाची सेवा करा : हसमत हवेरी
कोल्हापूर - जागतिक परिचारिका दिन बारा मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हसमत हवेरी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. उमाराणी जे. यांनी, नर्सेस फक्त रुग्णालयात काम करत नाहीत तर देश निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. रुग्णांना लवकर आजारातून बरे करण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्या पार पाडत असतात. सध्या नर्सेस क्षेत्र म्हणजे व्हॅल्युएबल इन्व्हेस्टमेंट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रमुख पाहुण्या हसमत हवेरी यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या विषयी आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्ण सेवा करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. डी वाय. पाटील हॉस्पिटलमधील सेवा सुविधेचे हवेरी यांनी कौतुक केले.
कुलगुरू डॉक्टर राकेशकुमार शर्मा यांनी, विदयार्थ्यांनी काळानुरूप बदल आत्मसात करत पुढे जाण्याचे आवाहन नर्सेस शिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही, नर्सेस ट्रीटमेंटमधील महत्त्वाचा भाग असल्याचे डॉ शर्मा यांनी सांगितले. प्राध्यापिका एम. बिजापूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रेड रिबीन उपक्रमांतर्गत रॅली, पोस्टरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सुनील आवटे यांच्यासह प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, नर्सिंग विद्यार्थी उपस्थित होते.