पंतप्रधानांनी जे सांगितले त्यावर घाबरून जाण्यात...: पेट्रोलियम मंत्र्यांचा खुलासा
पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांचे वक्तव्य
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीच्या केलेल्या आवाहनामुळे जनतेत अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. यावर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी जे सांगितले त्यावर घाबरून जाण्यात काही अर्थ नाही. त्यांनी काय सांगितले ते काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा चुकीचा अर्थ लावू नका, असा खुलासा केला आहे.
भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा, 60 दिवसांचा एलएनजीचा आणि 45 दिवसांचा एलपीजीचा साठा आहे. पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. जिथे शक्य असेल तिथे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. परदेश प्रवास टाळा. पश्चिम आशियात संकटामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाचा भार सरकारने जनतेवर पडू दिलेला नाही. तेल कंपन्यांना दररोज 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे आणि हे नुकसान 1,98,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.