अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला त्याच परिसरात पुन्हा एकदा विमान दुर्घटना...
पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूमुळे बारामतीकरांना विमान अपघाताचा धसका बसला आहे. असं असताना पुन्हा एकदा बारामतीकरांना विमान अपघाताचे थरारक दृश्य पहायला मिळाले . बारामती तालुक्यात प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
बारामतीतील गोजुबावी गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रेडबर्ड कंपनीचे हे विमान असून सुदैवाने वैमानिक बचावले आहेत. विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमकं विमान कशामुळे कोसळलं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस आणि संबंधित यंत्रणा तातडीने दाखल झाल्या आहेत.
विशेष म्हणजे हा अपघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता त्याच परिसरात झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.