जेट इंधनाच्या वाढत्या किंमतींचा फटका आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना...
नवी दिल्ली – एअर इंडियाने इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे जूनपासून पुढील तीन महिन्यांसाठी आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा फटका विमान प्रवाशांना बसणार आहे.
वाढत्या ऑपरेशनल खर्चामुळे अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील फ्लाइट सेवेमध्ये कपात केला जाणार आहे. यामुळे शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय या महत्त्वाच्या शहरांसाठी काही काळ फ्लाइट्स पूर्णपणे बंद राहणार आहेत. याशिवाय सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरोंटोसारख्या मार्गांवरील उड्डाणांची संख्या कमी केली जाणार आहे. एकूणच कंपनीने दररोजच्या सुमारे १०० आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये कपात केल्याची माहिती समोर आली आहे.