‘आपण वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी...’: आर्थिक संकटाबाबत उद्योगपती उदय कोटक यांच्याकडून चिंता 

<p>‘आपण वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी...’: आर्थिक संकटाबाबत उद्योगपती उदय कोटक यांच्याकडून चिंता </p>

नवी दिल्ली – ‘आपण सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. हा पूर्वतयारीचा एक भाग आहे. धक्का बसण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा, कठीण काळाचा सामना करण्यासाठी आपण आधीच तयार असायला हवं’, अशी चिंता कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी व्यक्त केली आहे. ते 'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' (CII) च्या कार्यक्रमात बोलत होते.

 भारताने खऱ्या अर्थाने आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी परकीय भांडवलावरील आपले अवलंबित्व कमी करणे आणि दीर्घकालीन जोखीम भांडवलाचा  एक मजबूत देशांतर्गत साठा निर्माण करण्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. मागील दोन महिन्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षामुळे सामान्य ग्राहकांसाठीच्या इंधनाच्या किमतींवर अद्याप तरी फारसा मोठा परिणाम झालेला नाही परंतु  भारताने देशांतर्गत आर्थिक पाया बळकट करणे फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.