थकबाकीदार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना तारीख पे तारीख... शेतकऱ्यांचा संताप 

<p>थकबाकीदार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना तारीख पे तारीख... शेतकऱ्यांचा संताप </p>

पुणे – शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम शंभर टक्‍के देण्यावरून   थकबाकीदार कारखानदारांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 
हंगाम 2025-26 संपूनही शेतकऱ्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखानदारांना 18 मे आणि अधिक रक्कम थकीत असलेल्या कारखान्यांना 20 मे ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. कारखानदारांबाबत साखर आयुक्तालयाच्या नरमाईच्या भुमिकेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरु झाले आहेत.  
शेतकरी संघटनांची आंदोलनाची धार पुर्वीच्या तुलनेत सध्या बोथट झालेली आहे. आणि  रक्कम देण्यासाठी कोणताच ठोस आंदोलनाचा पवित्रा घेतला जात नसल्याने साखर आयुक्तालयावर दबाव राहिलेला नाही. शिवाय साखर कारखान्यांनाही त्याचा धाक वाटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच मे महिना उजाडूनही शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याची चर्चा सुरु  झाली आहे.