सैनिकाच्या कारनाम्याने सगळेच आवाक...

चोरीचा बनाव रचणाऱ्या सैनिकाचे पितळ उघडं पडलं

<p>सैनिकाच्या कारनाम्याने सगळेच आवाक...</p>

कोल्हापूर – चंदगडमध्ये चोरीचा बनाव रचणाऱ्या सैनिकाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.  

९ मे रोजी चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील  महेश पाटील या भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाने चंदगड पोलीसांत त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याने तक्रारीत घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचं नमूद केलं होतं. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या समांतर तपासा दरम्यान फिर्यादी महेश पाटील कडेच संशयाची सुई वळली. अंमलदार दीपक घोरपडे आणि प्रवीण पाटील यांना फिर्यादी पाटील हा घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने घेऊन कागल मुरगूड रोडवरील पाटबंधारे कार्यालयाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे हा संशय अधिक बळावला.

मिळालेल्या माहिती नुसार, पोलीसांनी पाळत ठेवून महेश पाटीलला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या महेश पाटील याने अखेर पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली दिली. आर्थिक अडचण, कर्जबाजारीपणा आणि शेअर मार्केटमधील नुकसानीमुळे आपणच स्वतःच्या घरातील दागिने चोरुन चोरीचा बनाव रचल्याचे त्याने मान्य केले. त्याच्याकडून तब्बल २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. एका जवानाने स्वत; च्या घरी चोरी करुन चोरीचा बनाव रचल्याचे उघडकीला आल्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. चंदगड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.