खा.राहुल गांधींची मोदींवर टीका; ‘हे उपदेश नाहीत, अपयशाचे पुरावे’

<h2>खा.राहुल गांधींची मोदींवर टीका; ‘हे उपदेश नाहीत, अपयशाचे पुरावे’</h2>

मुंबई : इराण युद्ध आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी टाळणे, पेट्रोलचा वापर कमी करणे, परदेश दौरे कमी करणे आणि ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “हे उपदेश नसून गेल्या १२ वर्षांतील अपयशाचे पुरावे आहेत. देशाची परिस्थिती अशी झाली आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे, कुठे जावे आणि काय टाळावे हे सांगावे लागत आहे.” त्यांनी पंतप्रधानांवर जबाबदारी झटकून जनतेवर दोष टाकल्याचा आरोपही केला.

दरम्यान, हैदराबादमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत, ऑनलाइन कामकाज आणि खतांवरील सरकारी अनुदानाचा उल्लेख करत नागरिकांनी संयम आणि बचतीची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.