वाकरेच्या मिनी खासबाग मैदानाची तरुणांकडून स्वच्छता...
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वाकरे हे गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मल्ल आहेत. महाराष्ट्राला अनेक दिग्गज मल्ल या गावाने दिले आहेत. गावात ज्योतिर्लिंग, हनुमान, चौगले, माने, पोवार, वडाखालील तालीम अशा अनेक तालमी आहेत. पूर्वी गावात अनेक नामांकित मल्ल होते. तरीही गावात कुस्तीचे मैदान नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन सरपंच स्व.बापूसाहेब गणपती पाटील, उपसरपंच स्व.तुकाराम बाबूराव पाटील आणि त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी कुस्तीचे मैदान उभारण्यात मोलाचा वाटा दिला आहे.
१९८० च्या दरम्यान तीन एकर जागेत मिनी खासबाग मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र सध्या या मैदानाची दयनीय अवस्था झाली आहे. या मैदानात जनावरांचे शेण टाकणे, मैदानातील रिकाम्या जागेवर ओवऱ्या थापने. तसेच कचरा टाकून मैदानाचे अस्तित्व अनेकांनी मिटवून टाकले होते. त्यामुळे गावातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम राबवला आहे. गावातील छत्रपती शिवाजी महाराज फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते एस. पी.चौगले, पै. बाजीराव पाटील-देवरे, सचिन पाटील, कोतवाल कांबळे, संदीप पाटील, रामचंद्र पाटील, युवराज कुंभार,बापुसो सोनवणे, पंकज पाटील, भाऊ सोनवणे, युवराज माने, अमर करपे, विजय पाटील, धनाजी पाटील, राम पाटील, लखन पाटील यांच्यासह गावातील अनेक तरुणांनी एकत्र येत व्यासपीठ, आखाडा आणि मैदान परिसराची स्वच्छता केली आहे.
जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने कचरा उठाव करण्यात आला आहे. तसेच या मैदानाला लोक वर्गणीतून रूप देण्याचा प्रयत्न कऱण्यात येत आहे. मात्र या मैदानाच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी कुस्ती शौकिनांकडून कऱण्यात आली आहे.
यावेळी युवक बिरंजे, के. डी. माने, मधुकर तोडकर, शिवाजी तोडकर, पांडुरंग बिरंजे, अमर करपे, बापू पाटील, परशराम सुर्यवंशी, पंडीत कळके, विजय पाटील, संजय पाटील, तानाजी पाटील, दिपक माने, एम. पी. चौगले, पांडुरंग बिरजे, सचिन पोवार आदी उपस्थित होते.