'शंभू गर्जना' या महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

<p>'शंभू गर्जना' या महानाट्याच्या पहिल्याच प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद...</p>

कोल्हापूर -  इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या लेखणीतून साकारलेले 'शंभू गर्जना' हे महानाट्य मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाच्या प्रेरणादायी जीवनगाथेवर हे महानाट्य आधारित असून याचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कर्नल रणजित नलवडे, सिद्धी देशमुख, प्रा. शिवाजी सावंत, रणजित शिर्के, उद्योजक रौनक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. नाटकात जिवंतपणा आणण्यासाठी भव्यदिव्य सेट उभारण्यात आले आहे, यासह शाही लवाजमा, घोडे, उंट यांचा वापर करण्यात आला आहे. या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचे  प्रभावी चित्रण या नाट्यातून साकारण्यात आले आहे. बालपणापासून, राज्य कारभार चालणे ते मृत्यूपर्यंतचा सर्व इतिहास यामध्ये दाखवण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले असून हर्षल सुर्वे यांनी संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. यामधील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय करून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.