भारतीय कुस्ती महासंघाच्या कुस्तीपटू विनेश फोगाटला धक्का...
महासंघाने देशांतर्गत कोणत्याही स्पर्धांत सहभागी होण्यास तिला ठरवलं अपात्र
नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाने कुस्तीपटू विनेश फोगाटला कायद्याच्या चौकटीत बसवून २६ जून २०२६ पर्यंत तिला देशांतर्गत कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास अपात्र ठरवले आहे. सध्या विनेश फोगाट पुनरागमनासाठी प्रयत्न करत असताना महासंघाने तिला मोठा धक्का दिला आहे.
आज गोंडा येथे राष्ट्रीय खुल्या चाचणी स्पर्धेतून ती पुनरागमन करणार होती. अशात महासंघाने अपात्र ठरवल्याने पुनरागमनासाठी तिला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. विनेशवर शिस्तभंग आणि उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप महासंघाने केला आहे. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.