राज्यात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला आणि बाल विकास विभागाने घेतला मोठा निर्णय 

<p>राज्यात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला आणि बाल विकास विभागाने घेतला मोठा निर्णय </p>

मुंबई – राज्यात बाल अत्याचारांचे प्रमाण खूप वाढत आहे. अशा घटनेवेळी प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी उपलब्ध असणे गरजेचे आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे.
केंद्रित ऑनलाईन पद्धतीमुळे बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता  येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. याचबरोबर विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहेत. तसेच, बदली प्रक्रियेत गुणवत्ता, सेवाज्येष्ठता, प्राधान्यक्रम आणि नियमांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला जाणार आहे.