रुपाली चाकणकर यांची आज एसआयटीकडून चौकशी सुरु...
नाशिक - अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज एसआयटीकडून चौकशी केली जात आहे.
एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या चाकणकरांची चौकशी करत असून यावेळी महिला वकील उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.
रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, 22 मे पर्यंत अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.