अखेर जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान...
शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधींची उपस्थिती
चेन्नई – तामिळनाडू विधानसभेमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु बहुमत सिद्ध करताना त्यांना अनेक नाट्यमय घडामोडींचा सामना करावा लागला आणि आज अखेर अभिनेता जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
जोसेफ विजय यांना राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासह नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी खास विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक, नेते, उपस्थित होते.