छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मातृदिन साजरा...
कोल्हापूर - आज जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मातृदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णालयात सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसूती सुश्रुषा विभागातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आले. यावेळी रूपाली देसाई यांनी स्तनदा मातांना मार्गदर्शन केले आहे. रंजनाताई पाटील, कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले, नंदा माजगावकर, ज्ञानेश्वरी डोंगळे आदी यावेळी उपस्थित होत्या.