उसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या भिकाजी पाटीलला अटक... 25 किलो गांजा जप्त

<p>उसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या भिकाजी पाटीलला अटक... 25 किलो गांजा जप्त</p>

कोल्हापूर - पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजा पिकवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने आज मरळी येथे जाऊन कारवाई करत उसाच्या शेतात गांजा पिकवणाऱ्या भिकाजी पाटील याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीचा 25 किलोचा गांजा जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव, अंमलदार सत्यजित तानुगडे,  वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, अनिकेत मोरे, अशोक पवार, अरविंद पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.