आज आर्ट ऑफ लिव्हिंग कोल्हापूर शाखेच्यावतीने एसएससी बोर्ड ते सायबर चौक परिसरात स्वच्छता
कोल्हापूर - ध्यान चळवळीचे पुरस्कर्ते, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री. रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आज आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने "स्वच्छ परिसर, आनंदी मन" या उपक्रमांतर्गत एसएससी बोर्ड ते सायबर चौक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या स्वच्छता अभियानाला महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील सहकार्य लाभले. यामध्ये महापौर रूपारानी निकम यांनीही सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका डिम्पल गजवानी, धनंजय चव्हाण, करण पवार, स्मिता चव्हाण, राधिका मोरे, डॉक्टर सुरेखा बसर्गे, आर्या जाधव, राहुल मोहिते, आदित्य वेटाळे, पद्मजीत जाधव , प्रणव लोले आदींनी सहभाग घेतला.