कोल्हापूरात काँग्रेसची “संघटन, सृजन आणि अभियान” मोहीम; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

<p>कोल्हापूरात काँग्रेसची “संघटन, सृजन आणि अभियान” मोहीम; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद</p>

कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या “संघटन, सृजन आणि अभियान” या विशेष मोहिमेला कोल्हापुरातून १३ मार्चपासून प्रारंभ झाला असून ही मोहीम १८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

या मोहिमेअंतर्गत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जात आहे. इच्छुक व सक्रिय कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना पक्ष संघटनेत विविध पदांवर संधी दिली जाणार आहे.

या उपक्रमासाठी केंद्रीय निरीक्षक जयराज पाठक तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी सुनील मालके, राहुल वर्धा आणि कुंदाताई जेणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सोमवारी कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या मुलाखतींना कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

दरम्यान, १५ ते १८ एप्रिल दरम्यान गडहिंग्लज, चंदगड, आजरा, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, भुदरगड, राधानगरी, करवीर, कागल, पन्हाळा, शाहुवाडी व गगनबावडा या तालुक्यांमध्ये मुलाखतींचे नियोजन करण्यात आले आहे.

☑️तालुकानिहाय मुलाखत कार्यक्रम -

☑️१५ एप्रिल २०२६ -

09:00 – 10:30 → गडहिंग्लज

11:30 – 02:00 → चंदगड

04:00 – 06:00 → आजरा

 

☑️ १६ एप्रिल २०२६ -

09:00 – 01:00 → हातकणंगले

02:30 – 05:30 → शिरोळ

06:00 – 08:00 → इचलकरंजी

 

☑️ १७ एप्रिल २०२६ -

10:30 – 01:00 → भुदरगड

03:00 – 07:00 → राधानगरी

 

☑️ १८ एप्रिल २०२६ -

09:30 – 01:00 → करवीर

02:00 – 02:30 → कागल

02:30 – 03:00 → पन्हाळा

• 03:30 – 04:00 → शाहुवाडी

• 04:00 – 06:00 → गगनबावडा

 

या मोहिमेमुळे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.