बिग बॉस मराठीच्या महाट्रॉफीवर रत्नागिरीच्या कन्येन कोरलं नाव...
मुंबई – गेल्या १०० दिवसांपासून सुरु असलेला बिग बॉस मराठीचा सहावा सिझन काल संपला. या सहाव्या सिझनची महाट्रॉफी रत्नागिरीची कन्या तन्वी कोलतेने मिळवली. या सिझनमध्ये महाराष्ट्राने सदस्यांमधील भांडणं, वाद-विवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. यामध्ये तन्वीने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर महाट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर राकेश बापट हा उपविजेता ठरला. टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने या नावांचा समावेश होता.
तन्वीला तब्बल 15 लाखांचा चेक मिळाला आहे. विशेष म्हणजे तिला पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्याकडूनही 10 लाख रुपयांचे विशेष Voucherही मिळाले. इतकेच नाही तर, तुनवाल ई - मोटार्सकडून ई बाईकही मिळाली आहे. तसेच रितेश देशमुख यांच्याकडून आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देण्यात आला आहे.