आज आ. रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर...

<p>आज आ. रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर...</p>

कोल्हापूर – आज आ. रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी  इतिहास अभ्यासक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ.जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह त्यांच्या दोन कन्या सोबत होत्या.

यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासोबत असलेल्या स्नेहाला उजाळा दिला. रोहित पवार म्हणाले, अजितदादांचं निधन झाल्यानंतर साहेब थोडे मानसिक दृष्टिकोनातून खचले होते. मुलासारखेच होते ते, त्यामुळं थोडीशी तब्येत डाऊन झाली होती. महत्वाचे म्हणजे या वयात ट्रीटमेंट करायचं कोण धाडस करत नाही, पण साहेब त्यातून बाहेर आल्याचे ते म्हणाले.