येत्या बुधवारी डॉ. मधुकर बाचूळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर - पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट "निसर्गदूत - प्राचार्य डॉ.मधुकर बाचूळकर - चोळेकर" या पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी शहाजी लॉ कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे.
यावेळी माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रा. डॉ .जय सामंत, प्रा. अभयकुमार साळुंखे, गुलाबराव पोळ, प्रा.डॉ.एस.आर.यादव प्रा. डॉ. व्ही.एन शिंदे, डॉ. विश्वनाथ मगदूम आदींची प्रमुख उपस्थित असणार आहे. यावेळी गीतकार अमोल बुचडे यांचा पर्यावरणावर आधारित सुरेल गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.