भारतीय संस्कृतीचं खास आकर्षण असलेली इन्फ्लुएन्सर लिजलैज, क्रिकेटर विराटमुळे चर्चेत ...
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आयपीलमध्ये आपल्या फलंदाजीने मैदान गाजवत आहे. मात्र, एका गोष्टीमुळे त्याची चर्चा होताना दिसतेय. नुकतेच विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलैज हिचा फोटो लाईक केल्याने चर्चांना उधाण आलंय. नेटकऱ्यांनी या फोटोला उचलून धरलं असतानाच विराट कोहलीच्या या सपोर्टसाठी इन्फ्लुएन्सर लिजलैज हिने विराटचे आभार मानलेत. पण काही वेळानंतर हा फोटो अनलाईक झाल्यानं ती नाराज झालीये. इन्फ्लुएन्सर लिजलैज ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर,कॉन्टेन्ट क्रिएटर, मॉडेल आहे. ती उत्तम गायिका असून ट्रॅव्हल व्हलॉग्सही बनवते. खासकरून तिला भारतीय संस्कृतीचं आकर्षण सुद्धा आहे. त्यामुळे इन्फ्लुएन्सर लिजलैज चर्चेत आहे.