56 इंचांची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेसची एवढी भीती का वाटते : नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मुंबई – काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांना संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी, ‘आजच्या भाषणात मोदींनी 150 पेक्षा अधिक वेळा काँग्रेसचे नाव घेतलं. 56 इंचांची छाती असणाऱ्या मोदींना काँग्रेसची एवढी भीती का वाटते, असा सवाल उपस्थित केला आहे.
नाना पटोले यांनी यांनी म्हटले आहे कि, पंतप्रधान हे देशाला जेव्हा संबोधन करतात तेव्हा देश हितासाठी किंवा संकट आल्यावर बोलतात असं मला आजवर माहीत होते. देशाचा पंतप्रधान वारंवार खोट बोलत असल्याने त्यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास राहिला नाही. 2023 साली महिला आरक्षण बिल आणल्यावर सर्व विरोधी पक्षांनी त्याला सपोर्ट केला आणि मंजूर झाला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होते की, 2024 मध्ये आम्ही जनगणना करु, त्यानंतर मतदारसंघांची रचना करण्यात येईल, असं सांगितले. आता 2026 साल उजाडले आहे. राहुल गांधीच्या दबावामुळे यांना जनगणना मान्य करावी लागली. आता जनगणना सुरू झाली. त्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही. यावरून देशाचे पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात आहे हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.