महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री...:  नारीशक्ती विधेयकावर अंजली दमानियांची भाजपवर टीका  

<p>महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री...:  नारीशक्ती विधेयकावर अंजली दमानियांची भाजपवर टीका  </p>

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारीशक्ती विधेयकावर बोलताना “विरोधी पक्षानं बॅंड वाजवून डान्स करावा”, असे उद्गार काढले होते यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करून  भाजपवर जोरदार टीका केली आहे. 
 ज्या भाजपने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये, फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह ! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३% (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डान्स करेल, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.