आता तुम्ही कसले डमरू वाजवत आहात…: खा. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई - 2023 साली सर्वानुमते महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालेला कायदा जो तुम्ही लागू केलेला आहे, राष्ट्रपतींनी त्यावर सही केलेली आहे आणि आता तुम्ही कसले डमरू वाजवत बसलेले आहात? तुम्ही कोणाला फसवत आहात?, असा हल्लाबोल खा. संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन आमचा निषेध करणार आहेत. तुम्ही स्वतःचाच निषेध करा. मी काल म्हणालो की, पंतप्रधानांनी या देशाची माफी मागायला पाहिजे. उद्या देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात काही चुकीचे विधान केले तर त्यांना देखील माफी मागावी लागेल.