संसदेत मांडलेलं विधेयक महिला आरक्षणाच नव्हतंच : खा. सुप्रिया सुळे यांचा दावा 

<p>संसदेत मांडलेलं विधेयक महिला आरक्षणाच नव्हतंच : खा. सुप्रिया सुळे यांचा दावा </p>

मुंबई – लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावर तीन दिवस चर्चा झाली. या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले नाही. यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून हे विधेयक विरोधी पक्षाने कसे नामंजूर केले यावर डंका वाजवला जात आहे. यावर पत्रकार परिषद घेवून  खा. सुप्रिया सुळे यांनी, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकावर अंमलबजावणी का नाही, असा सवाल करत त्यांनी,  संसदेत मांडलेलं विधेयक महिला आरक्षणाच नव्हतंच, असा दावा त्यांनी केला आहे. 
खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे कि, 50 टक्के जागा वाढवण्यासाठी 543 जागांवर निर्णय तात्काळ का घेतला जात नाही. मुळात प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढणार हे विधेयकात नव्हतंच. परिसीमन आणि महिला आरक्षणाचा काय संबंध आहे. २०२३ मध्ये मंजुरी दिलेल्या विधेयकावर जातीय जनगणना करण्यासाठी  सरकारने पैसे दिले नाहीत. तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनातून सरकारला काय मिळाले, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.