इचलकरंजीतील शिवतीर्थ चौक आणि बसस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी

<p>इचलकरंजीतील शिवतीर्थ चौक आणि बसस्थानक परिसरातील फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी</p>

इचलकरंजी - शहरात गेल्या दहा वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून शिवतीर्थ चौक आणि बस स्थानक परिसरातील महापालिकेच्या जागेत फेरीवाल्यांसाठी मुव्हेबल गाळे बसवले होते. या गाळयांमधून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र आता या ठिकाणचे गाळे काढून ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे गाळे काढल्यास फेरीवाल्यांना व्यवसाय बंद करावा लागणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे पुनर्वसनाची मागणी करत फेरीवाल्यांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

 यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक तानाजी पवार, सुनील महाजन, रवी रजपुते मनोज हिंगमिरे, प्रदीप धोत्रे, मनोज साळुंखे यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते.