इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा : विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील

<p>इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा : विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील</p>

इचलकरंजी - शहरातला कचरा उठाव करण्यासाठी २२ कोटी रुपयांचे फेर टेंडर भरण्यात आले आहे. हेच टेंडर गतवर्षी १४ कोटी रुपयांचे होते. मग यावर्षी सात कोटी रुपये जादा का द्यावेत, असा सवाल करत महापालिकेतील विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनी याला विरोध केला होता.

आज स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या दालनात याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात टेंडर रद्द व्हावे, यासाठी नऊ नगरसेवकांनी मतदान केले तर टेंडरच्या बाजून सहा जणांनी मतदान केले. विशेष म्हणजे काही सत्ताधारी नगरसेवकांनीही या टेंडरच्या विरोधात मतदान केले. मतदानानंतर हे २२ कोटीचे टेंडर रद्द करण्यात आले. इचलकरंजी महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असून या प्रकरणी स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.

या पत्रकार बैठकीला शशांक बावचकर, परवेज गैबान, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.