‘या’ तीन जिल्ह्यांना रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के 

<p>‘या’ तीन जिल्ह्यांना रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के </p>

परभणी – मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना रात्री  १.३७ वाजल्यापासून ३.२३ वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ३.६ ते ४.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या शिरली गावात होता. हा भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही.