सामुहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
इचलकरंजी - शहरातील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सात जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीला आला होता. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात संशयितांवर गुन्हा दाखल करून यातील तिघांना अटक करण्यात आली होती तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या प्रकरणानंतरही पीडिता आणि तिच्या कुटुंबावरील मानसिक ताण कमी झाला नसल्याची गंभीरबाब समोर आली आहे. आज पिडीता घराबाहेर पडल्यानंतर संशयितांच्या नातेवाईकांनी पिडीतेकडे रागाने बघितले त्यानंतर पिडीतेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पिडीतेच्या आईने सांगितले.
पिडीतेला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पिडिता सध्या भीतीच्या छायेत असून पिडीतेच्या आईने न्यायाची मागणी केली आहे.