मुरगूडच्या लिटल मास्टर गुरुकुल शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अनावकर यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान
मुरगूड – मुरगूड येथील लिटल मास्टर गुरुकुल शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सुभाष अनावकर यांना २०२६ चा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देवून नुकतंच गौरवण्यात आले आहे. यावेळी दैनिक बंधुता यांच्यावतीने विजयलक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते सुमन अनावकर यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.
अनावकर या मानसशास्त्र विषयाच्या पदवीधर असल्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन, ज्ञान आणि संस्कार देण्याचे कार्य त्या प्रभावीपणे करत आहेत. अध्यात्म आणि विज्ञान यांची सुंदर सांगड घालत भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.