विधान भवनाच्या आवारात शेतकऱ्यांचे झाडावर चढून आंदोलन...
मुंबई – सातबारा कोरा करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या आवारात अनोखे आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या शेतकऱ्यांनी विधान भवनाच्या आवारातील झाडावर चढून जोरदार आंदोलन सुरु केले असून पोलिसांकडून या शेतकऱ्यांना समजवण्याचे काम सुरु आहे, परंतु शेतकरी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.