मुंबई-गोवा महामार्गावर संततधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी... 

<p>मुंबई-गोवा महामार्गावर संततधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी... </p>

मुंबई – राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या वाढत्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 
महामार्गालगत असणाऱ्या सुकेळी खिंड आणि मोठ्या डोंगर घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे मुख्य महामार्गावर पाणी आले आहे. नागोठणे-कोलाड मार्गावरील सुकेळी व महाराष्ट्र सीमलेस (जिंदाल) कंपनीजवळ खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली आहे. पहाटे चार वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी झाली असून पोलीस ही वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.