धक्कादायक : ‘या’ राज्यात पेपर फुटला...परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

<p>धक्कादायक : ‘या’ राज्यात पेपर फुटला...परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ</p>

भोपाळ – महाराष्ट्रात नीट, टीईटी पेपर फुटीचे प्रकरण खूप चर्चेत असताना मध्यप्रदेश राज्यातही पेपर फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. 
पेपर फुटल्याने तडकाफडकी परीक्षा रद्द करण्याची वेळ विद्यापीठावर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळची परिस्थिती निर्माण झालीय. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशातील राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालयात घडला आहे. 
परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिटे चोरीला गेल्यामुळे विद्यापीठाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा रद्द करावी लागली आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.