ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन 

<p>ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन </p>

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे आज निधन झाले आहे. याबाबतची माहिती अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी दिली आहे. दयामा यांच्या निधनाने कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 
अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी, रामाकांत दयामा यांचे  गाणे म्हणतानाचा आणि इतर कलाकारांसोबत नृत्य करतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी रामाकांत यांना श्रद्धांजली वाहणारी भावनिक पोस्टही लिहिली आहे.