माणकापुरात डंपरच्या धडकेत रांगोळीचा युवक ठार... दोघे जखमी

<p>माणकापुरात डंपरच्या धडकेत रांगोळीचा युवक ठार... दोघे जखमी</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील गणेश कांबळे, साहिल कांबळे आणि अर्जुन मिरजे हे सोमवारी दुचाकीवरुन कामानिमित्त इचलकरंजीला गेले होते. काम आटोपून ते रांगोळीहून इचलकरंजीला येत होते. याच वेळी इचलकरंजीहून मुरूमाने भरलेला डंपर इचलकरंजीकडे जात होता. निपाणी तालुक्यातील माणकापूर बसस्थानकाजवळ आल्यानंतर दुचाकी आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही दूर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात नेले. मात्र यातील गणेश कांबळे याचा रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीचे मृत्यु झाला. या अपघातामधील अन्य दोघा जखमींवर कोल्हापुरातील रूग्णालयात उपचार सुरू आहे.